रमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका

पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय. 

Updated: Jun 18, 2015, 08:55 PM IST
रमजानच्या मुहूर्तावर 'सद्भावना' : मच्छिमार कैद्यांची होणार सुटका title=

कराची : पाकिस्ताननं आज मालिर तुरुंगात बंद असलेल्या 113 भारतीय मच्छिमारांची सुटका केलीय. 

नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी फोनवरून रमजानच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर काही दिवसांनीच सद्भावनेचं पाऊल उचलत पाकिस्ताननं भारतीय कैद्यांना सोडून देण्याचा निर्णय घेतला.

सुटका झालेले भारतीय मच्छिमार काराकोरम एक्स्प्रेसमधून लाहोरला जातील. त्यानंतर त्यांना उद्या (शुक्रवारी) वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येईल.

नरेंद्र मोदींनी शरीफ यांना फोनवरून रमजानच्या शुभेच्छा देताना भारतातील तुरुंगात कैद असलेल्या 88 पाकिस्तानी मच्छिमारांना सोडून देण्याच्या भारताच्या निर्णयाची माहितीही त्यांना दिली होती. त्यामुळे रमजानच्या पवित्र मुहूर्तावर हे पाकिस्तानी मच्छिमार आपल्या कुटुंबीयांसोबत असणार आहेत. 

फेब्रुवारी महिन्यातही 172 भारतीय मच्छिमारांची मालिर तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.