पाकिस्तानच्या अणवस्त्र केंद्रांवर हल्ला करणार होत्या इंदिरा गांधी

 भारत-पाकिस्तान संबंधात वितुष्ट असताना सीआयएच्या दस्तऐवजात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला की १९८०मध्ये सत्तेत आलेल्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या परमाणू केंद्रावर हल्ला करण्याचे ठरविले होते. 

Updated: Aug 31, 2015, 09:46 PM IST
पाकिस्तानच्या अणवस्त्र केंद्रांवर हल्ला करणार होत्या इंदिरा गांधी  title=

वॉशिंग्टन :  भारत-पाकिस्तान संबंधात वितुष्ट असताना सीआयएच्या दस्तऐवजात एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. यात दावा करण्यात आला की १९८०मध्ये सत्तेत आलेल्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानच्या परमाणू केंद्रावर हल्ला करण्याचे ठरविले होते. 

पाकिस्तानला अणवस्त्र तयार करण्याच्या क्षमतेपासून रोखण्यासाठी इंदिरा गांधी हे धाडसी पाऊल उचलण्याच्या तयारीत होत्या. 

अधिक वाचा : न्यूयॉर्क टाइम्सला भारत पाकिस्तान युद्धाची भीती

केंद्रीय गुप्तचर संघटना सीआयएतर्फे आठ सप्टेंबर १९८१ मध्ये 'पाकिस्तानच्या अणवस्त्र विकासावर भारताची प्रतिक्रिया या शीषर्काचे एक दस्तावेज तयार करण्यात आले होते. त्यात त्यावेळी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा विचार केला होता. त्याच वेळी अमेरिकेने पाकिस्तानला लढाऊ विमान एफ १६ विकण्याचा अंतीम टप्पा होता. 

सीआयएच्या वेबसाइटवर या वर्षी जूनमध्ये १२ पानांचे दस्तावेज संपादित संस्करण टाकण्यात आले. त्यानुसार १९८१ मध्ये इंदिरा गांधी आणि भारत सरकार पाकिस्तानच्या अणवस्त्र कार्यक्रमाच्या प्रगतीमुळे चिंतित होते. त्यांचे असे म्हणणे होते, पाकिस्तान अणवस्त्र मिळविण्याचा अत्यंत जवळ आहे. त्याचे अमेरिकेला माहित होते. 

अधिक वाचा : पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज

 

काय लिहिले रिपोर्टमध्ये 

तत्कालिन अतिसंवेदनशील सीआयए रिपोर्टमध्ये दावा केला की, पुढील दोन तीन महिन्यात भारताची चिंता वाढली तर आमचे असे मानणे आहे की या परिस्थिती पंतप्रधान गांधी पाकिस्तानच्या अणवस्त्र केंद्रावर हल्ला करू शकतील. अणवस्त्र तयार करण्याचा केंद्र उद्धवस्त करण्यसाठी सैनिकी कारवाई करण्यास प्रारंभ केला जाऊ शकतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.