आणि असा निघाला पोटातून लोखंडाचा ढीग...

दक्षिण आफ्रिकेतील एका तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क अडीच किलो एवढे लोखंड म्हणजे भंगार शस्त्रक्रिया करून बाहेर काढले. 

Updated: Jul 8, 2015, 06:06 PM IST
आणि असा निघाला पोटातून लोखंडाचा ढीग... title=

केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेतील एका तरुणाच्या पोटातून डॉक्टरांनी चक्क अडीच किलो एवढे लोखंड म्हणजे भंगार शस्त्रक्रिया करून बाहेर काढले. 

 
या तरुणाला 'पिका' नावाचा आजार झाला आहे. या आजारात त्या व्यक्तीला माती, धातू, काच, कोळसा अशा प्रकारच्या शरिराला घातक असणाऱ्या वस्तू खाण्याची सवय लागते.  
 
या 25 वर्षीय तरुणाला आपल्या बालपणापासूनच अशा विचित्र वस्तू खाण्याची सवय झाली होती. काही दिवसांपूर्वी अचानक त्याला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर अल्सर असल्याची शंका व्यक्त केली.
 
पण त्याच्या पोटाचा एक्सरे पाहून मात्र डॉक्टरसुद्धा चकीत झाले. या व्यक्तीच्या पोटात लोखंडी वस्तूंचा मोठा ढीग असल्याचे समोर आले.
 
या लोखंडी वस्तूंच्या वजनामुळे त्या तरुणाचे पोट काहीसे उजव्या बाजूला कलले होते. पोटावर शस्त्रक्रिया करून  डॉक्टरांनी त्याच्या पोटातून निरनिराळी नाणी, चाव्या तसेच लोखंडी तुकडे बाहेर काढले. शिवाय आश्चर्य म्हणजे एक चाकूसुद्धा त्याच्या पोटात मिळाला. 
 
शरिरासाठी अनावश्यक अशा गोष्टी आजतागायत पोटात घेऊन तो कसा काय वावरत होता याचे कुतूहल डॉक्टरांनाही वाटले. आता त्या युवकाची प्रकृती स्थिर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.