गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार; खासदार ११ वर्षांसाठी तुरुंगात

गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार प्रकरणातील आरोपी आणि सार्वजनिक निधी घोटाळ्यातील दोषी एका खासदाराला स्थानिक न्यायालयानं ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 17, 2014, 12:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
गर्भवती टीव्ही अँकरवर बलात्कार आणि सार्वजनिक निधी घोटाळ्यातील दोषी एका खासदाराला स्थानिक न्यायालयानं ११ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावलीय.
सार्वजनिक निधीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणात अडकलेल्या शुआंगचेंग सिटी इंडस्ट्री कॉर्पोरेशनचे माजी महाप्रबंधक आणि हेइलोंगजिआंग प्रांताचे `शुआंगचेंग पीपल्स काँग्रेस` या राजकीय पक्षाचे उपप्रमुख सुन देजिआंग याच्यावर एका महिला टीव्ही अँकरनं लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात दोषी आढळलेल्या सुन याला ११ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलीय.
सुन देजिआंग याच्यावर स्थानिक टीव्ही अँकर वांग देचून हिनं बलात्काराचा आणि लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करण्याचा आरोप केला होता. देचून हिनं २०१२ साली मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर एक पोस्ट टाकून हे आरोप जाहीर केले होते. यामध्ये, ४४ वर्षीय देचून हिनं आपल्या आईच्या पेन्शनसाठी आणि स्थानिक टीव्ही चॅनलमध्ये आपल्या पदावर टिकून राहण्यासाठी आपल्यावर लैंगिक संबंधासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला.
सरकारी संवाद समिती शिन्हुआनं दिलेल्या माहितीनुसार, सून यानं बलात्कार केला तेव्हा देचून हीनं आपण सात महिन्यांची गर्भवती असल्याचंही म्हटलं होतं. हे माहीत असूनही सुन यानं आपल्याला लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती केल्याचा तिनं केला होता.
वांग देचून हिनं, सुन देजिआंग याच्यावर वैयक्तिक फायद्यासाठी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा आरोप केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.