टोकियो : पश्चिम जपानमध्ये झालेल्या भयंकर भूस्खलनात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण अजूनही गायब आहेत. सरकारने बुधवारी सांगितलं, की भूस्खलनमुळे अनेक घरं गाडली गेली आहेत.
टीव्हीवर दाखविण्यात आलेल्या फोटोंनुसार हिरोशिमामध्ये काल रात्री डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले आणि त्यात अनेक घरं गाडली गेलीत. घटनास्थळी लोकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे.
कॅबिनेट कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कार्यालयातील एका अधिकाऱ्य़ाने सांगितलं की, पोलिस खात्यानुसार मृत्यू झालेल्याची संख्या सुरूवातीला ४ होती, जी नंतर झपाट्याने वाढून २७ झाली. नेमके किती जण मृत्युमुखी पडले हे अद्याप सांगणे कठीण आहे.
आपातकालीन सेवा पुरवणाऱ्या दलाच्या एएफपीने सांगितलं की, असे अनेक ठिकाण चिन्हांकित केली गेली आहेत जेथे अनेक लोकं जिवंत गाडले गेल्याची शंका आहे. अग्निशमक आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने सांगितलं की, भूस्खलनामुळे मरणाऱ्य़ांमध्ये ५३ वर्षीय एक बचाव कामगाराचा ही समावेश आहे. विमानातून घेतलेल्या फोटोमध्ये अनेक घर जमीनदोस्त झाल्याचं दिसतं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.