लास वेगासमध्ये माणसाने केले स्मार्टफोनशी लग्न

हल्ली जगात काय घडेल सांगता येत नाही. प्रेमात माणूस आंधळा होतो असे म्हटले जाते मात्र लास वेगासमध्ये एका माणसाने या प्रेमात चक्क एका स्मार्टफोनशीच लग्न केले. 

Updated: Jun 30, 2016, 08:38 AM IST
लास वेगासमध्ये माणसाने केले स्मार्टफोनशी लग्न title=

लॉस एंजेलिस : हल्ली जगात काय घडेल सांगता येत नाही. प्रेमात माणूस आंधळा होतो असे म्हटले जाते मात्र लास वेगासमध्ये एका माणसाने या प्रेमात चक्क एका स्मार्टफोनशीच लग्न केले. 

हे खरंच घडलंय. खऱ्याखुऱ्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पड़लाय. आरोन शेर्व्हेनाक असं या माणसांच नाव आहे. लग्नात ज्या प्रमाणे एकमेकांना साथ देण्याची शपथ घेतली जाते. त्याचप्रमाणे या सोहळ्यात आर्नोकने शपथ घेतली. 

यावेळी आरोनने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. मोबाईललाही पांढऱ्या रंगाचे कव्हर घालण्यात आले होते. तो या नव्या रिलेशनशिपबद्दल उत्सुक असल्याचे आरोनने म्हटलेय.