नेपाळ भूकंप : २२ तासानंतर ४ महिन्याच्या मुलांला वाचवण्यात यश

नेपाळमध्ये प्रलंकारी भूकंपानंतर होत्याचे नव्हेत झाले. अनेक जण मातीच्या ढीगाऱ्यात गाढले गेलेत. अनेकांचा बळी गेला. काहींना जखमी अवस्थेत मातीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून एका चार महिन्यांच्या बाळाला तब्बल २२ तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आले.

Updated: Apr 29, 2015, 04:48 PM IST
नेपाळ भूकंप : २२ तासानंतर ४ महिन्याच्या मुलांला वाचवण्यात यश title=

काठमांडू : नेपाळमध्ये प्रलंकारी भूकंपानंतर होत्याचे नव्हेत झाले. अनेक जण मातीच्या ढीगाऱ्यात गाढले गेलेत. अनेकांचा बळी गेला. काहींना जखमी अवस्थेत मातीतून बाहेर काढण्यात आले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून एका चार महिन्यांच्या बाळाला तब्बल २२ तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात जवानांना यश आले.

नेपाळमधील एका न्यूज वेबसाईट पूर्वेली न्यूजने याबाबत एक वृत्त दिले आहे. राजधानी काठमांडूपासून ५ किमी अंतरावर भक्ततूरमध्ये मातीच्या ढीगाऱ्यातून चार महिन्यांच्या बाळाला सुरक्षितपणे  बाहेर काढण्यात यश आले.

नेपाळमध्ये ५४ वयाच्या महिलेला जिवंत बाहेर काढले. तर काठमांडू येथे ८४ तासानंतर एकाला जिवंत बाहेर काढण्यात आले. तर नेपाळ फ्रेंच सर्च रेस्क्यू टीमने २८ वर्षीय तरुणाला मंगळवारी जिवंत बाहेर काढले. तसेच शनिवारी ४ महिन्यांच्या बाळाला २२ तासानंतर बाहेर काढण्यात आले.

नेपाळमध्ये ७.९ रिस्टर स्केल क्षमतेचा भूकंप झाला. यामध्ये ५००० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेलाय. तसेच त्यानंतर पाऊस पडल्याने मदत कार्यात अडथळा निर्माण झाला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.