माद्रीद : मोरक्कोच्या एका प्रवाशाचा सूटकेसमध्ये मृत्यू झाला आहे. या प्रवाशाला सूटकेसमध्ये टाकून स्पेनला घेऊन जाण्याचा प्रयत्न होत होता.
स्पेन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सुटकेसमधील मृत व्यक्तीला त्याचा भाऊ, सुटकेसमध्ये टाकून बेकायदेशीरपणे जहाजाने स्पेनच्या अल्मेरिया शहरात आणत होता.
हे दोन्ही भाऊ मेलिलामधून जहाजात बसले आणि मेलिला ही स्पेनची टेरीटरी म्हणजेच एंक्लेव आहे. मात्र सुटकेसमध्ये बसलेल्या २७ वर्षीय युवकाचा यात मृत्यू झाला.
मृत तरूणाच्या भावाजवळ फ्रान्सचा पासपोर्ट आहे. मृत व्यक्तीच्या भावावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.