www.24taas.com , झी मीडिया,लंडन
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अमेरिकेचा व्हिसा देऊ नये म्हणून काही भारतीय खासदारांनी फिल्डींग लावली. यावरून बराच वाद झाला. तर कट्टर हिंदूत्ववादी मोदी आहेत, असा ठपका ठेवत काही देशांनी मोदींना परदेश बंदी केली. मात्र, आता ब्रिटनने मोदींना व्हीसा देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे मोदींचा लंडन प्रवासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नरेंद्र मोंदींबाबत कडक पवित्रा मागे घेतल्याचे संकेत ब्रिटनमधील सरकारने दिलेत. तब्बल दहा महिन्यांनी ब्रिटनला भेट देण्याचे आमंत्रण मोदींना देण्यात आले आहे. मोदींचा मार्ग मोकळा करण्यासाठी ब्रिटन देशातील दोन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी पुढाकार घेतला. इंडिया ग्रुपतर्फे मोदींना ब्रिटन भेटीचे आमंत्रण देण्यात आलेय.
ब्रिटनमधील विरोधी पक्ष मजूर पक्षाच्या `लेबर फ्रेंड्स ऑफ इंडिया या गटातर्फे अध्यक्ष खासदार बॅरी गार्डिनर यांनी मोदी यांना गेल्या आठवड्यात याबाबचे पत्र पाठविले आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मोदी हे ‘आधुनिक भारताचे भवितव्य’ या विषयावर भाषण देतील. सत्ताधारी हुजूर पक्षानेही मोदी यांना पत्र लिहून ब्रिटन भेटीचे आमंत्रण दिले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.