मोदी टाईम्सच्या ‘पर्सन ऑफ द इअर'च्या यादीत

भाजपचे पंतप्रधान पादाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाईम या प्रतिष्ठित मासिकाच्या `पर्सन ऑफ द इअर`साठीच्या मानांकितांच्या यादीत स्थान पटकावलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Nov 26, 2013, 03:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क
भाजपचे पंतप्रधान पादाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी टाईम या प्रतिष्ठित मासिकाच्या `पर्सन ऑफ द इअर`साठीच्या मानांकितांच्या यादीत स्थान पटकावलंय.
इतकंच नाही तर वाचकांद्वारे घेतल्या जाणा-या ऑनलाईन मत चाचणीमध्येही मोदींनी सुरवातीला आघाडी मिळवल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे टाईमच्या यंदाच्या यादीत मोदी हे एकमेव भारतीय आहेत.
टाईमने यंदाच्या पर्सन ऑफ दी इयर साठी नेते, उद्योजक आणि सेलिब्रेटी अशा विविध क्षेत्रातील ४२ जणांची यादी तयार केलीये. यातील विजेत्यांची घोषणा पुढल्या महिन्यात करण्यात येणार आहे.
मोदींसमवेत या यादीत ब्रिटिश राजघराण्याचा नवा वारस प्रिन्स जॉर्ज, पाकिस्तानातील मलाला युसुफझाई, अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझॉस अमेरिकन हेरगिरीची गुपिते जगजाहिर करणारा एडवर्ड स्नोडेन यांचाही समावेश आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.