पॅरिसनंतर नायजेरियाच्या योलामध्ये दहशतवादी हल्ला

पूर्व नायजेरियाच्या योलामध्ये लोकांच्या गर्दीत एक बॉम्बस्फोट झाला आणि ३० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. 

PTI | Updated: Nov 18, 2015, 01:34 PM IST
पॅरिसनंतर नायजेरियाच्या योलामध्ये दहशतवादी हल्ला title=
फाईल फोटो

कादुना, नायजेरिया: पूर्व नायजेरियाच्या योलामध्ये लोकांच्या गर्दीत एक बॉम्बस्फोट झाला आणि ३० हून अधिक जणांचा मृत्यू झालाय. हा हल्ला अशावेळी झाला ज्याच्या काहीच दिवसांपूर्वी योलामध्ये आलेले राष्ट्रपती मोहम्मद बुहारी यांनी बोको हराम पराभवाच्या छायेत असल्याचं म्हटलं होतं. हा स्फोट अदमावा राज्याच्या राजधानी योलाच्या जम्बुतु भागात झाला. स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजून २० मिनीटांनी हा स्फोट झाला.

आणखी वाचा - LIVE - पॅरिसमध्ये दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान गोळीबार

योलामध्ये राष्ट्रीय आपत्कालीन प्रबंधन एजंसीच्या समन्वयक साद बेल्लो यांनी सांगितलं, 'आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय आणि जवळपास ८० जण जखमी झाले आहेत.' या स्फोटाची पद्धत बोको हरामच्या हल्ल्यासारखी आहे. बोको हरामनं यापूर्वी सुद्धा योलामध्ये आयईडी स्फोट आणि आत्मघाती हल्ला केला होता.

आणखी वाचा - आयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!

बुहारी यांनी या महिन्यात योलामध्ये दहशतवादी विरोधी अभियानात शौर्य दाखवल्यानं जवानांचा सन्मान केला होता. याशिवाय त्यांनी सहा वर्षांपासून हिंसेमुळं विस्थापित झालेल्या लोकांचं शिबीर आयोजित केलं होतं. या हिंसेत कमीतकमी १७ हजार लोकांचा मृत्यू झालाय. बुहारी यांनी जवानांना म्हटलं, बोको हराम पराभवाच्या छायेत आहे. आणि त्यांनी जवानांना सतर्क राहण्याचं, आपलं लक्ष्य साध्य करण्याचं आवाहान केलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.