www.24taas.com, झी मीडिया, प्योंगयांग
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांने आपल्या सख्या काकांची क्रुरपणे हत्या केली. त्यांने १२० भुकेलेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडून दिले. या कुत्र्यांनी त्यांचे लचके तोडून त्यांना मारले. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जैंग सोंग थाएक हे हुकूमशहा किम जोंग याचे काका होत. या हुकूमशहाने आतापर्यंत केलेली क्रुर हत्या आहे. हुकूमशहा किम जोंग यांने आपल्या काकाला नग्नावस्थेत भुकेलेल्या कुत्र्यांच्या पिंजऱ्यात सोडले. तीन दिवसांपासून हे कुत्रे उपाशी ठेवण्यात आले होते. भुकेलेल्या कुत्र्यांनी त्यांचा फडशा पाडला.
`वेन वेई पो` या स्थानिक वृत्तपत्राने ही घटना १२ डिसेंबर रोजी घडल्याचे म्हटले आहे. हाँगकाँग येथील हे वृत्तपत्र चीनी भाषेतून प्रकाशीत होते. हुकूमशहाने जैंग यांच्याबरोबरच त्यांच्या पाच सहकाऱ्यांनाही कुत्र्याच्या पिंजऱ्यात लोटून दिले. हा सर्व क्रूरतेचा खेळ हुकूमशहा किम जोंग यांच्या देखरेखीखाली एक तासभर सुरू होता, असे दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
तसेच याचे वृत्त `क्वैन जे` या वर्तमानपत्राने दिले आहे. उत्तर कोरियामध्ये साधारणपणे गोळया झाडून हत्या केली जाते. मात्र अशा प्रकारे हत्या पहिल्यांदाच झाली असून हत्याचे समर्थन करीत राज्यातील घाण साफ केली असे सांगत किम जोंग यांनी हत्या केल्याची कबुली आपल्या भाषणात दिली.
डिसेंबर २०११ रोजी वडिलांचे अचानक निधन झाल्यानंतर किम यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. परंतु त्यांना जास्त अनुभव नसल्याने सुरूवातीला त्यांचे काका थाएक हेच अप्रत्यक्षपणे कारभार पाहत होते. मात्र, थाएक यांना सत्ताधारी वर्कर्स पार्टी आणि देशविरोधी कारवाया केल्याप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे त्यांची अशी क्रुरपणे हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.