आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद

 आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

Updated: Dec 5, 2015, 05:42 PM IST
आता घेता येणार सोन्याच्या चॉकलेटचा आस्वाद title=

टोकियो :  आता तुम्हाला सोन्याची चॉकलेट खाण्यासाठी मिळणार आहे.  नेस्ले या कंपनीने या चॉकलेटचं उत्पादन केलं आहे. ही चॉकलेट खाण्यायोग्य सोन्यापासून  बनवण्यात आली आहे. चॉकलेटला वन फिंगर किटकॅटचा आकार देण्यात आला आहे.

नेस्ले कंपनी ही डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत 500 चॉकलेट जपानमधील 8 किटकॅट दुकानांमध्ये  विकणार आहे. या चॉकलेटवर खाण्यायोग्य सोन्याचा वर्ख दिला गेला आहे.  या चॉकलेटची किंमत जवळपास १०६८ रुपये आहे. 

जपानमध्ये नेस्ले कंपनी जवळपास 30 प्रकारच्या चॉकलेट विकते. ज्यामध्ये ग्रीन टी, वसावी आणि पर्पल पोटॅटो अशा पक्रारची वेगवेगळ्या फ्लेवरचा समावेश आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.