हॅक ट्वीटर अकाऊंटवरून स्वराज यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले आहेत. पाकिस्तानातील जिओ न्यूज या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्या ट्विटर हँडलवर ही शेरेबाजी आहे, मात्र हमीद मीर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं स्पष्टीकरण जिओ न्यूज चॅनेलने दिले आहे.

Updated: Dec 8, 2015, 11:39 PM IST
हॅक ट्वीटर अकाऊंटवरून स्वराज यांच्यावर आक्षेपार्ह ट्वीट title=

इस्लामाबाद : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट करण्यात आले आहेत. पाकिस्तानातील जिओ न्यूज या वृत्तवाहिनेचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांच्या ट्विटर हँडलवर ही शेरेबाजी आहे, मात्र हमीद मीर यांचं ट्विटर अकाऊंट हॅक झालं असल्याचं स्पष्टीकरण जिओ न्यूज चॅनेलने दिले आहे.

हमीद मीर यांच्या हॅक झालेल्या ट्विटर हँडलवरुन आक्षेपार्ह ट्वीट करतांना म्हटलंय, “सुषमा स्वराज यांचे नवाज शरीफ यांच्यासोबत खासगी संबंध असून त्या मौजमजा करण्यासाठी येथे आल्या आहेत, असे माझ्या सूत्रांनी सांगितले आहे".
 
‘जिओ न्यूज’चं स्पष्टीकरण
जिओ न्यूजचे वरिष्ठ पत्रकार हमीद मीर यांचं ट्विटर अकाऊंट ८ डिसेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हॅक झालं. शिवाय, या अकाऊंटवरुन हॅकर्स ट्वीट करत आहेत.  तसेच, संध्याकाळी 6:30 नंतरचं कोणतेही ट्वीट हमीद मीर यांचं मत म्हणून ग्राह्य धरु नका, असं आवाहनही जिओ न्यूज वृत्तवाहिनीने केलं आहे. हमीद मीर यांचा मोबाईल फोनही हॅक करण्यात आला आहे, अशी माहिती जिओ न्यूजने वेबसाईटवरुन दिली.

सुषमा स्वराज पाकिस्तान दौऱ्यावर
भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज मंगळवारी संध्याकाळी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये दाखल झाल्या. हार्ट ऑफ एशिया संमेलनात सहभागी होण्यासाठी सुषमा पाकिस्तानाच्या दौऱ्यावर आहेत.सुषमा स्वराज पाकिस्तानचे पररराष्ट्र सल्लागार सरताज अजीज यांना भेटणार असून, त्यांची पंतप्रधानांची भेट घेऊ शकतात. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.