www.24taas.com, झी मीडिया, लाहोर/ इस्लामाबाद
चौदा वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राज पाहायला मिळणार आहे. शरीफ यांच्या राजकीय पक्षाने आतापर्यंत १२५ सर्वाधिक जागा पटावल्या आहेत. त्यामुळे तेच पंतप्रधानपदी विराजमान होतील.
लष्कर प्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पाकमध्ये लष्करी उठाव केल्यानंतर १९९९ मध्ये शरीफ यांना पदच्युत केले होते. सार्वत्रिक निवडणुकीत चांगले यश मिळाल्याने तिसर्यां दा पंतप्रधान होत असलेल्या शरीफ यांना मुशर्रफनी फाशी सुनावली होती. मात्र नंतर हकालपट्टीवर निभावले. पाकिस्तानमध्ये १४ वर्षांनंतर परतलेल्या शरीफ यांच्या हाती जनतेने त्यांना पुन्हा सत्ता सोपवली आहे. २७२ पैकी २३५ जागांचे निकाल जाहीर झाले असून १०७ जागा शरीफ यांच्या पक्षाने पटकावल्या. बहुमतासाठी १३७ चा आकडा त्यांना पार करावा लागेल.
नवाझ शरीफ तसेच इम्रान खान हे मोठ्या मताधिक्याने जिंकलेत. शरीफ यांच्या पक्षाने १२५ पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली असून दुसऱ्या स्थानासाठी माजी क्रिकेटर इम्रान खानचा पक्ष तहरीक - ए - इन्साफ आणि सत्ताधारी पाकिस्तान पिपल्स पार्टीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, परवेझ मुशर्रफ यांच्या पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. इम्रान खानच्या पक्षाला ३२ जागा तर सत्तेत पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा पहिला पक्ष ठरलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला फक्त २८ जागा मिळवता आल्या आहेत.
पाकिस्तानात तालिबान्यांच्या प्रचंड दहशतीखाली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ यांच्या मुस्लिम लीगची यश संपादन केलेय. तिसऱ्यांदा `शरिफ` राज येणार हे निश्चित झाले आहे. शरीफ यांनी विजयाचा आनंद व्यक्त करताना पाकिस्तानी जनतेची पुन्हा सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी अल्लातालाचे आभार मानत आहे, असे उद्गार काढले.
तालिबानी धमकींना भीक न घालता पाकमधील सुमारे ७० टक्के मतदारांनी निर्भीडपणे मतदान केल. कराची, पेशावर आणि क्वेट्टामधील बॉम्बस्फोटांमुळे मतदानाला गालबोट लागले. यामध्ये २४ जणांचा मृत्यू झाला. निवडणुकप्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी म्हणून मतदान आटोपताच मतमोजणीला सुरूवात करण्यात आली. त्यामुळे रात्रभर पाकिस्तान जागले असून आतापर्यंतच्या निकालांवरून शरीफ यांच्या पक्षाने बाजी मारल्याचे स्पष्ट दिसत आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.