आबुधाबी : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दोन दिवसाच्या संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर रवाना होणार आहे. गेल्या ३४ वर्षात भारतीय पंतप्रधानांचा हा पहिला दौरा आहे. यापूर्वी १९८१ मध्ये इंदिरा गांधी यांनी यूएईचा दौरा केला होता. या दौऱ्यात मोदी पहिल्यांदा परदेश दौऱ्यात एका मशिदीला भेट देणार आहे.
जे 34 वर्षात झालं नाही ते होणार...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यूएईच्या दौ-यावर... 34 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधान यूएईचा दौरा करणार आहे... त्यामुळंच पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक आहे.. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या देशात पैसा कमावण्यासाठी 26 लाख भारतीय जातात त्या देशात 34 वर्षांपासून एकही भारतीय पंतप्रधान गेलेले नाहीत.. 1981 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी यूएईचा दौरा केला होता..
वेळोवेळी भारतीय राष्ट्रपतींनी यूएईचे दौरे केलेत.. मात्र 34 वर्षांनी भारतीय पंतप्रधानांचा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जातोय.. यूएईचे युवराज आणि सशस्त्र सेनेचे जनरल शेख मोहम्मद बिन जायेद अल नहयान यांच्या निमंत्रणावरुन मोदी यूएईचा दौरा करतायत...
भारतातील गुंतवणूक मोदींच्या अजेंड्यात सर्वाधिक महत्त्वाची बाब असेल.. भारतात पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूकीसाठी यूएईला आकर्षित करण्याचा पंतप्रधान प्रयत्न करतील.. ऊर्जा आणि व्यापार क्षेत्रात सहकार्यावर दोन्ही देशात चर्चा होईल. सुरक्षा क्षेत्रातही सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चेची शक्यता आहे. प्रत्यर्पण, कायदेशीर सहकार्य आणि मादक द्रव्यांच्या तस्करीबाबतही दोन्ही देशांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.. इसिसच्या धोक्यासंदर्भातही दोन्ही देशांमध्ये बातचीत होण्याची शक्यता आहे..
पहिल्यांदा परदेश दौऱ्यात मोदी देणार मशीदीला भेट
अबुधाबीत दाखल झाल्यानंतर मोदी शेख जायद मशिदीला भेट देतील.. यूएईमधील ,सगळ्यात मोठी मशिद अशी शेख जायद मशिदीची ओळख आहे.. अबुधाबीत मोदी युवराज शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा करतील. सोमवारी मोदी दुबईला पोहचतील. दुबईत मोदी यूएईचे पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती तसंच दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मख्तूम यांची भेट घेतील.. त्यानंतर जगातील सगळ्यात मोठी इमारत बुर्ज खलिफा इथं मोदी जातील.. दुबई क्रिकेट मैदानातून मोदी भारतीयांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदी मसदर सिटीचाही दौरा करतील.. झीरो कार्बन अशी ओळख असलेलं हे हायटेक शहर आहे.. स्वच्छ भारत अभियान दौ-याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या शहराच्या भेटीला खास महत्त्व आहे..
यूएईमध्ये राहणा-या 26 लाखांहून अधिक भारतीयांच्या योगदानाचं पंतप्रधानांनी कौतुक केलंय..
यूएईमध्ये राहणा-या आणि काम करणा-या कष्टकरी भारतीयांना भेटण्यासाठी उत्सुक आहे.. ते दरवर्षी 13 अब्ज डॉलर पाठवतायत..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.