आपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस

सौदीचा प्रिंस माजिद अल-सउद आपल्या पूर्ण स्टाफला नग्न करून फिरवत होतो, असा आरोप त्याच्यावर आहे. महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर या अगोदरच केस सुरू आहे. सऊदवर लॉस एंजेलिस इथल्या आपल्या बंगल्यातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. त्याची सुनावणी सुरू आहे.

Updated: Oct 27, 2015, 01:21 PM IST
आपल्या स्टाफला न्यूड व्हायला सांगायचा सौदीचा प्रिंस title=

लॉस एंजेलिस: सौदीचा प्रिंस माजिद अल-सउद आपल्या पूर्ण स्टाफला नग्न करून फिरवत होतो, असा आरोप त्याच्यावर आहे. महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार करण्याच्या आरोपाखाली त्याच्यावर या अगोदरच केस सुरू आहे. सऊदवर लॉस एंजेलिस इथल्या आपल्या बंगल्यातील तीन महिला कर्मचाऱ्यांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप लावलाय. त्याची सुनावणी सुरू आहे.

या सुनावणी दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या अर्जात सौदीचा प्रिंस आपल्या संपूर्ण स्टाफला स्विमिंग पूलवर न्यूड व्हायला सांगायचा. त्याचं म्हणणं होतं की, त्याला लोकांना कपड्याविना बघायला आवडतं.

आणखी वाचा - पुस्तकाचा दावा : इमरान-बेनझीरमध्ये प्रेम आणि शारिरीक संबंध

ब्रिटनचं वर्तमानपत्र डेली मेलनुसार महिलांनी लीगल डॉक्युमेंट्समध्ये हा दावा केलाय. सौदी अरबचे किंग असलेले अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अल सऊदींच्या ३५ मुलांपैकी २९ वर्षीय माजिदला गेल्या महिन्यात लॉस एंजेलिसमधील त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. त्याच्या शेजाऱ्यांनी एका महिलेला घरात ओरडतांना, रडतांना, पळतांना पहिलं होतं. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांत तक्रार केली. महिला कसंही करून सऊदी प्रिंसच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती, ती जखमी होती.

एवढंच नव्हे तर तिनही महिलांचा आरोप आहे की, इतर स्टाफचंही लैंगिक शोषण केलं जात होतं. पीडित महिलांचा आरोप आहे की, त्यांच्या इच्छेविरुद्ध प्रिन्सनं त्यांना बंगल्यात कैद करून ठेवलं होतं. सौदी राजघराण्यातील सदस्य माजिदवर महिलांना मारणं आणि जबरदस्तीनं 'ओरल सेक्स' करण्याच्या आरोपात केस सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तीन लाख डॉलरचा बॉन्ड भरल्यानंतर त्याची जामिनावर सुटका झालीय. 

आणखी वाचा - पैशाचा हव्यास, २७४२ व्यक्तींसोबत शारिरीक संबंधासाठी पत्नीला जबरदस्ती

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.