रियाद: 10 वर्षाची एक मुलगी जिचा मित्र आहे एक सिंह. तिला चित्त्यासोबत झोपायला आवडतं. ती दररोज लांडग्यासोबत खेळते. याला आपण काय म्हणाल सिंह, चित्ता आणि लांडग्यासोबक राहणं तर दूर त्यांच्याजवळ जाण्याबद्दल आपण स्वप्नातही विचार करू शकत नाही. मात्र सौदी अरेबियामधील ही 10 वर्षीय चिमुरडी या तिन्ही प्राण्यांसोबत आपल्या घरात राहते. तिला अजिबात भीती वाटत नाही. आश्चर्याची बाब म्हणजे हे प्राणी तिला अजिबात नुकसान पोहोचवत नाहीत.
10 वर्षीय मदावी अल अनजी केवळ जनावरांसोबत खेळतच नाही, तर त्यांच्यासोबत एकाच खोलीत राहते. अनजीचं म्हणणं आहे की, ती या प्राण्यांशिवाय राहूच शकत नाही. या तिन्ही प्राण्याचं वय 3 ते 18 (सिंह, चित्ता आणि लांडगा) महिन्यांदरम्यान आहे. अनजी म्हणते, माझं या तिघांवर खूप प्रेम आहे आणि त्यांच्याशिवाय मला झोप येत नाही.
अनजीला तिच्या वडिलांनी अशाप्रकारे प्राण्यांसोबत राहण्याचं विशेष ट्रेनिंग दिलंय. मात्र अनजीनं दुसऱ्या मुलांना इशारा दिलाय की अशाप्रकारे त्यांनी हा प्रयोग करून नये. तिला खास ट्रेनिंग मिळालंय. अनजी या तिन्ही प्राण्यांना आपल्या घरचं सदस्य मानते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.