वॉशिंग्टन : पाकिस्तान हे जगातलं आठव्या क्रमांकाचं धोकादायक राष्ट्र ठरलंय. अमेरिकेतल्या इंटेल सेंटर या खासगी कंपनीनं जगातल्या धोकादायक राष्ट्रांची यादी जाहीर केलीये. यात पाकिस्ताननं पहिल्या दहात स्थान पटकावलंय.
इराक सर्वात धोकादायक असल्याचं समोर आलंय. इंटेल सेंटर ही कंपनी जगभरातल्या गुप्तचर यंत्रणांना सहाय्य पुरवते. या यादीमधले टॉप १० देश असे. पहिल्या दहांमध्ये अनुक्रमे इराक, नायजेरिया, सोमालिया, अफगाणिस्तान, येमेन, सिरीया, लिबिया, पाकिस्तान, इजिप्त, केनिया या देशांचा समावेश असल्याचेही म्हटले आहे.
दक्षिण आशियाई देशातील केवळ अफगाणिस्तानचाच या यादीत समावेश आहे. गेल्या महिनाभरात दहशतवाद्यांचे तसेच बंडखोरांचे हल्ले, तसेच त्यासंबंधीची छायाचित्रे, व्हिडिओ तसेच हल्ल्यांमध्ये मृत आणि जखमी झालेल्यांच्या संख्येवरून हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.