अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला

अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

PTI | Updated: Jan 13, 2016, 01:16 PM IST
अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर हल्ला title=

काबूल : अफगाणिस्तानात भारतीय दूतावासावर स्फोट घडवून आणण्यात आला. सलग दुसऱ्या दिवशी हा हल्ला करण्यात आलाय.

जललाबादमधील भारताच्या दूतावासावर हा हल्ला चढविण्यात आलाय. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यामध्येही पाकिस्तानच्याच लष्कराचा हात आहे, असा दावा बल्ख प्रांताचे पोलीसप्रमुख सय्यद कमाल सादात यांनी केला आहे.

भारतीय दूतावासाच्या ठिकाणी घातपात करणारे हल्लेखोर पाकिस्तानमधून आले होते. ते पाकिस्तानचे प्रशिक्षित सैनिक होते. या सैनिकांना दरी, पश्तो या अफगाण भाषांसह उर्दू भाषाही अवगत होती, असे सादात यांनी सांगितले.