चार पायांची कोंबडी तुम्ही पाहिली का...

 चीनमधील शाँगडाँग येथील एका शेतात तब्बल चार पायांची कोंबडी पाहायला मिळाली. ही कोंबडी पाहून लोक घाबरले आणि याचे मांस खाण्या लायक आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली. 

Updated: Mar 9, 2016, 06:06 PM IST
चार पायांची कोंबडी तुम्ही पाहिली का...  title=

शाँगडाँग (चीन) :  चीनमधील शाँगडाँग येथील एका शेतात तब्बल चार पायांची कोंबडी पाहायला मिळाली. ही कोंबडी पाहून लोक घाबरले आणि याचे मांस खाण्या लायक आहे की नाही यावर चर्चा सुरू झाली. 


image - weibo

या संदर्भात चीनच्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या बातमीनुसार ही कोंबडी या शेतातली नाही पण ती झू झैनू या शेतकऱ्याच्या मुलीला परिसरात सापडली. या कोंबडीला दोन नाही चार पाय आहेत. दोन पाय़ तिच्या खालील बाजूस आहे. 

झू यांनी या विचित्र दिसणाऱ्या पक्षाला घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. आता या कोंबडीला पाहायला लोकांची रांग लागली आहे. 

ही कोंबडी एक महिन्यांची असून ती आपल्या दोन पायांनी पळू शकते. ती किती दिवस जगेल ही सांगू शकत नाही, असेही शेतकऱ्यांनी पत्रकारांना सांगितले.