www.24taas.com, न्यूयॉर्क
ट्युनिशियामधील अमिनाच्या समर्थनार्थ जगभरातल्या मुस्लिम महिलांनी फेसबुकवर आपले टॉपलेस फोटो अपलोड करत आंदोलन सुरू केलं आहे. याद्वारे त्यांनी इस्लामी संस्कृतीलाच आव्हान दिलं आहे.
अमिना या १९ वर्षीय मुलीने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर आपला अर्धनग्न फोटो अपलोड केला होता. या फोटोत तिने आपल्या उघड्या वक्षस्थळांवर इस्लामी संस्कृतीला आव्हान देणारं वक्तव्य लिहून निषेध व्यक्त केला होता. यानंतर काही दिवसांतच तिचं अपहरण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. नंतर तिला वेड्यांच्या इस्पितळात दाखल केलं असल्याचं वृत्त आलं. या घटनेला जगभरातील अनेक मुस्लिम महिलांनी विरोध केला.
अनेक मुस्लिम महिलांनी आपले अर्धनग्न फोटो फेसबुकवर अपलोड करण्यास सुरूवात केली आहे. अमिनाला पाठिंबा देत अनेक महिलांनी आपल्या उघड्या वक्षस्थळावर अमिनाच्या स्वातंत्र्याबद्दल वाक्य लिहिली आहेत.