आर्थिक विकासासाठी पाकिस्तान आणि चीनची 'रंडी'

 पाकिस्तान आणि चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी सोमवारी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल‘ (रंडी) असे नाव दिले आहे. परंतु, वेश्या व्यवसाय करत असलेल्या स्त्रीला या नावाने संबोधण्यात येत असल्याने ट्विटरवरून या नावाची खिल्ली उडविण्यात आली.

Updated: Apr 21, 2015, 02:07 PM IST
आर्थिक विकासासाठी पाकिस्तान आणि चीनची 'रंडी' title=

बीजिंग :  पाकिस्तान आणि चीनने आपल्या आर्थिक विकासासाठी सोमवारी नव्याने स्थापन केलेल्या थिंक टँकला ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल‘ (रंडी) असे नाव दिले आहे. परंतु, वेश्या व्यवसाय करत असलेल्या स्त्रीला या नावाने संबोधण्यात येत असल्याने ट्विटरवरून या नावाची खिल्ली उडविण्यात आली.

पाकिस्तान सरकारच्या इस्लामाबादमधील कार्यालयाने सोमवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की पाकिस्तान आणि चीनने मिळून एक थिंक टँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘रिसर्च अँड डेव्हलपमेंट इंटरनॅशनल‘ (रंडी) असे या थिंक टँकचे नाव असून, याचे दोन अध्यक्ष असणार आहेत. माजी मंत्री मादमी झाओ बैग आणि सिनेटर मुशाहिद हुसेन हे अध्यक्ष असतील. 

या थिंक टँकचे वृत्त ट्विटरवर प्रसिद्ध होताच हिंदी भाषिकांकडून यावर खिल्ली उडविणारे ट्विट येण्यास सुरवात झाली. काही नागरिकांनी असे खरेच नाव ठेवले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ‘पाकिस्तानने आता अधिकृत मान्य केले, की ते चीनचे -- आहेत.‘, असे एका नागरिकाने म्हटले आहे.

चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पाकिस्तान दौऱ्यावर असून, त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अध्यक्ष मामनून सेन यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पाकिस्तानमध्ये ऊर्जा आणि पायाभूत विकासाच्या प्रकल्पांसाठी 46 अब्ज डॉलर गुंतविणार असल्याचे जाहीर केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.