वायरल व्हिडिओ: जेव्हा म्हशीने सिंहाला ५ मीटर उंचावर फेकलं

एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. हा जंगलातील व्हिडिओ आहे. म्हशींच्या एका कळपावर सिंहानं हल्ला केला. तेव्हा एका म्हशीनं आपल्या शिंगांनी सिंहाला हवेत फेकलं. सिंह जवळपास पाच मीटर उंचावर फेकला गेला. 

Updated: Aug 10, 2015, 11:43 AM IST
वायरल व्हिडिओ: जेव्हा म्हशीने सिंहाला ५ मीटर उंचावर फेकलं  title=

मुंबई: एक आश्चर्यकारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय. हा जंगलातील व्हिडिओ आहे. म्हशींच्या एका कळपावर सिंहानं हल्ला केला. तेव्हा एका म्हशीनं आपल्या शिंगांनी सिंहाला हवेत फेकलं. सिंह जवळपास पाच मीटर उंचावर फेकला गेला. 

दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर राष्ट्रीय उद्यानातील हा व्हिडिओ कैद झालाय. तब्बल ४५ मिनीटं सिंह आणि म्हशींचा हा थरार सुरू होता. 

५२ वर्षीय इयान मॅथेसन हे आपला मुलगा ऑलिव्हरसह राष्ट्रीय उद्यानात फिरत होते. तेव्हा त्यांनी हे दृश्य पाहिलं आणि आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. या थरारत सर्व प्राणी जखमी झाले. 

पाहा हा थरारक व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.