जगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी

 प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.

Updated: Apr 26, 2015, 10:10 AM IST
जगात भारतापेक्षा बांग्लादेश, पाकमधील लोक अधिक सुखी title=

लंडन : प्रत्येक जण सुखी व्हावं ही उदात्त भावना अख्ख्या जगासाठी भारतीय ऋषींनी आणि संतांनी बोलून दाखवली आहे. मात्र स्वतः भारतीय हा महान संदेश आचरणात आणण्यात अपयशी ठरल्याचं, नुकत्याच झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पाहणीत आढळून आलंय.

जागतिक सुख-समाधान निर्देशांकानुसार सुखी देशांच्या यादीत, 158 देशांमध्ये भारत चक्क 117 व्या स्थानावर आहे. देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न, आयुष्यमान, सामाजिक आधार आणि जीवनातल्या पर्यायांच्या निवडीतलं स्वातंत्र्य, या निकषांच्या आधारे, जागतिक सुख-समाधान निर्देशांक ठरवण्यात आला. 

यात सर्वाधिक गुणांसह स्वित्झर्लंडनं जगात पहिलं स्थान पटकावलं. विशेष म्हणजे या यादीत पाकिस्तान ८१ व्या स्थानी, चीन ८४ व्या, तर बांगलादेश १०९व्या क्रमांकावर आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.