www.24taas.com, ब्रसेल्स
इराणने जर्मनी, स्पेन, इटली, ग्रीस, पोर्तुगल आणि नेडरलँड या युरोपिय देशांचं तेल रोखण्याची धमकी दिली आहे. इराणचं म्हणणं आहे, जर हे देश इराणविरुद्ध कारवाई करत राहिले तर या देशांना इराण कडून मिळणारं तेल बंद करण्यात येईल. आरआयए नोवोस्ती या न्यूज एजंसीच्या म्हणण्यानुसार अल् अरेबिया नेटवर्कच्या मते तेल उपमंत्री अहमद किलेबानी यांनी असं विधान केलं आहे की जर युरोपिय राष्ट्रांनी आपली शत्रूतापूर्ण कारवाई थांबवली नाही, तर युरोपिय देशांना मिळणाऱ्या तेलावर निर्बंध लादण्यात येतील.
'नॅशनल इराणियन ऑईल कंपनी'ने अनेक युरोपियन तेल ग्राहकांना यासंदर्भआत पत्र पठवलं आहे. हे पत्र म्हणजे एक प्रकारचं अल्टिमेटमच आहे. २७ युरोपिय राष्ट्रांच्या विदेश मंत्र्यांनी आणि नेत्यांनी २३ जानेवारीला ब्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीत इराणच्या तेलविषयक धोरणावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.
ग्रीस, इटली आणि स्पेन हे युरोपिय देश संपूर्णतः इराणच्या तेलावरच उभे आहेत. किलेबानी यांनी जानेवारीमध्येच पूर्वसूचना दिली होती की युरोपिय राष्ट्रांनी लादलेल्या प्रतिबंधामुळे तेलाचे भाव प्रति बॅरल १५० डॉलर्सने वाढतील.