www.24taas.com, वॉशिंग्टन
पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांदरम्यान टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईनला अमेरिकेने विरोध केला आहे. विरोध करताना अमेरिकेने म्हटले आहे, ही योजना चुकीची आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते व्हिक्टोरिया न्यूलँड यांनी पत्रकारांशी बोलताना हे वक्तव्य केले. ही योजना दोन्ही देशांसाठी चांगली नाही. इराण आणि पाकिस्तानमधील वाढत्या संबंधांवरून हे वक्तव्य केले असल्याची चर्चा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही या पाईनलाईनबोबत होत असलेल्या योजनेविषयी चर्चा होताना पाहिले आहे. ही एक बिनकामाची योजना असून, यामुळे काहीही होऊ शकत नाही. ही योजना कितपत यशस्वी होईल, हे सांगता येत नाही. याबाबत पाकिस्तान सरकारशी बोलणी करण्यात आल्याचे ते म्हणाले.
इस्लामाबादमध्ये पाकिस्तान आणि इराण या दोन्ही देशांमध्ये शुक्रवारी या योजनेबाबत चर्चा झाली होती. या चर्चेनंतर पाकिस्तानने या योजनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही प्रभाव पडणार नसल्याचे वक्तव्य केले होते. या योजनेनुसार इराण पाकिस्तानला दररोज २१.५ मिलियन क्यूबीक मीटर प्राकृतिक गॅस देणार आहे.