पुरूषांबरोबर नाच; चार महिलांना केले ठार

पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.

Updated: Jun 4, 2012, 08:48 PM IST

www.24taas.com,  इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये विवाह सोहळ्यात पुरुषांबरोबर नृत्य करतानाचे मोबाईलवरील चित्रीकरण पाहून जिरगा आदिवासी जमातीच्या पंचायतीने महिलांना दोषी ठरवत त्यांना ठार मारण्याचे आदेश दिले आणि त्याची कारवाईही झाली. एका लग्न सोहळ्यात पुरुषांसोबत गाणे आणि नृत्य करणे चार महिलांसाठी जिवावर बेतले आहे.

पाकिस्तानच्या वायव्येकडील कोहिस्तान जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकर घडला. महिलांसोबत नाचणाऱ्या दोघा पुरुषांनाही जात पंचायतीने दोषी ठरविले. मात्र, दोघे पळून गेल्याचे सांगण्यात आले. एका वृत्तवाहिनीने ही बातमी प्रसारित केल्यानंतर पाकिस्तानात एकच खळबळ उडाली. पाकिस्तानचे गृहमंत्री रेहमान मलिक यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले.

मात्र, माहिती प्रसारणमंत्री इफ्तेकार हुसेन यांनी हे वृत्त चुकीचे असल्याचे सांगितले. कोहिस्तान जिल्ह्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, त्यांच्या माहितीनुसार हे वृत्त खोटे असल्याचे हुसेन यांनी सांगितले.