ल्युईसियानाच्या गव्हर्नरपदी बॉबी जिंदाल

अमेरिकेतील ल्युईसियानाच्या गव्हर्नरपदी भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांची चार वर्षांसाठी फेरनिवड झाली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिंदाल यांनी नऊ उमेदवारांविरोधात सहज विजय संपादन केला.

Updated: Oct 24, 2011, 02:21 AM IST

झी २४ तास वेब टीम, वाशिंग्टन

अमेरिकेतील ल्युईसियानाच्या गव्हर्नरपदी भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल यांची चार वर्षांसाठी फेरनिवड झाली. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जिंदाल यांनी नऊ उमेदवारांविरोधात सहज विजय संपादन केला.
गव्हर्नर म्हणून आणखी चार वर्षांसाठी मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुढील काळात नागरिकांसाठी अनेक कामे करायची आहेत, असे जिंदाल यांनी विजयानंतर सांगितले. या निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदान झाले होते. त्यापैकी ६६ टक्के मते जिंदाल यांना मिळाली. त्यांच्यानंतर तारा होलिज यांना १८ टक्के मते मिळाली. उर्वरित आठ उमेदवारांना दोनआकडी मतेही मिळू शकले नाहीत.

भारतीय वंशाचे बॉबी जिंदाल हे वयाच्या ३६ वर्षी पहिल्यांदा गव्हर्नरपदी निवडून आलेत. गव्हर्नरपद भूषविणारे ते पहिले भारतीय आहेत.