आमीर खानला लागले खासदारकीचे वेध!

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.

Updated: Sep 14, 2014, 08:26 PM IST
आमीर खानला लागले खासदारकीचे वेध! title=

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानला खासदारकीचे वेध लागले आहेत. आमीरला अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटर सचिन तेंदुलकर यांच्या राज्यसभेतील गैरहजेरी बदल प्रश्न विचारताच त्यांच्यावर कोणतीही टीका न करता म्हणाला की, ते माझे मित्र आहेत. जर मला खासदार होण्याची संधी मिळाली. तर मी त्याबदल नक्कीच विचार करीन. त्यावेळी मी समाजासाठी किती चांगले योगदान देऊ शकतो. याकडे विशेष लक्ष्य केंद्रित करून दररोज हजेरी लाविल.

‘इंडिया टुडे ग्रुप’च्या एका कार्यक्रमामध्ये आमीर आला होता. तेव्हा त्याला हिंदी चित्रपट सृष्टीतील महिला ज्या पद्धतीनं दाखविण्यात येतात त्याबदल प्रश्न विचारला असता, आमीर म्हणाला, ”हो मी मानतो की, चित्रपटात नेहमी महिलांची भूमिका  ही बेजबाबदारपणे दाखविण्यात येते, ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ आणि ‘खंबे जैसी खडी है’ या सारख्या गाण्यांमुळं देखील समाजात चुकीचा संदेश जातो”.

आपण नेहमी महिलांचा आदर केला पाहिजे. मी स्वीकारतो की, यात माझा देखील समावेश आहे. आजपासून मी असं करणार नाही. मी माझ्या मित्रांसोबत देखील या विषयावर चर्चा करून येत्या काळात महिलांबदल संवेदनशील राहिल, असंही आमीर म्हणाला.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.