मुंबई : अभिनेता रणवीर सिंग यांच्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रणवीरवर खार येथील हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल येथे एक खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याला उद्या रविवारी सकाळी १०.३० वाजता घरी सोडण्यात येईल, अशी माहिती रुग्णालयाच्यावतीने देण्यात आला.
संजय लीला भन्साली यांच्या 'बाजीराव मस्तानी' च्या सेट वर त्याच्या हाताला दुखापत झाली होती. आज त्याच्या खांद्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.