मुंबई : अभिनेत्री आणि मॉडेल अर्शी खान पाकिस्तानी खेळाडू शाहित आफ्रिदी याच्यासोबतच्या रिलेशनशीप संदर्भात सनसनी खुलासे करत आहेत. अर्शीने ट्विट केलेय, शाहिदबरोबर मी सेक्स केलाय. आता तर तिने म्हटलेय मी शाहिदवर प्रेम करत आहे. मी लग्नाचा प्रस्तावरही त्याच्यापुढे ठेवलाय.
अर्शी खानने झी मीडियाशी बोलताना सांगितले, मी शाहिद आफ्रिदीवर प्रेम करत आहे. तोही माझ्यावर तेवढेच प्रेम करतो. लोक आमच्याबद्दल बोलू लागले आहेत. वृत्तपत्रात याबाबत वृत्त येत आहे. त्यामुळे मी ट्विट केले.
मी प्रेम केले आहे. त्यामुळे घाबरायचे कशाला? (प्यार किया तो डनरा क्या), असे अर्शी म्हणाली. पाकिस्तानतील मीडियापर्यंत ही गोष्ट गेली आहे. अर्शीबरोबर शाहिद लग्न करण्यासाठी तयार आहे. इंशा अल्लाह जल्दी ऐसा होगा, असे म्हणत लग्नाचा प्रस्ताव मांडला.
अर्शीने सांगितले, ट्विट केल्यानंतर शाहिदशी बोलणे झालेले नाही. मात्र, तो लग्नासाठी तयार आहे. असे असले तरी ट्विटवर अजून उत्तर मिळाले नाही. जर उत्तर आले तर ते प्रथम मीडियाला माहित होईल. मी झी मीडियाच्या माध्यमातून शाहिदसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवत आहे, असे तीने दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
त्याआधी अर्शीने ट्विट केले होते, पाकिस्तान टी-२०चा कर्णधार शाहिद आफ्रिदी सोबत सेक्स केला आहे. त्यासाठी मला भारतीय मीडियाची परवानगी घेण्याची गरज नाही. ती ट्विटमध्ये म्हटलेय, काय, मला कोणासोबत झोपायचे असेल तर भारतीय मीडियाची परवानगीची कशाला हवेय जरुरी? माझे जीवन आहे. मी कसे जगायचे ते मी ठरवणार? माझ्यासाठी हे प्रेम आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.