मुंबई : बॉलिवूडचा अभिनेता आदित्य रॉय कपूरनं आपल्या आयुष्यात कुणीही 'गर्लफ्रेंड' नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे, अनेकांच्या नजरा साहजिकच आदित्य आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरकडे वळल्यात.
मुंबईत सुरु असलेल्या 'लॅक्मे फॅशन वीक समर रिजॉर्ट २०१५'मध्ये आदित्यला त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यानं आपल्या आयुष्यात 'गर्लफ्रेंड' नाही, असं उत्तर दिलंय.
'आशिकी 2'मधील आदित्य आणि श्रद्धा कपूर यांची केमिस्ट्री जुळून आली होती... रिल लाईफसोबतच रिअल लाईफमध्येही हे जोडपं एकमेकांत अडकल्याचं बऱ्याचदा दिसून आलं होतं. त्यामुळे, आदित्यच्या या नव्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न या दोघांच्याही चाहत्यांना पडलाय.
फॅशन शोमध्ये ब्रॅंड टॉम टेलर डेनिमसाठी आदित्यने कॅटवॉक केला. बॉलिवूडमध्ये सर्वात स्टायलिश कोण? असा प्रश्न जेव्हा त्याला विचारला गेला तेव्हा त्यानं सोनम कपूर आणि इमरान खानचं नाव घेतलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.