मुंबई : केंद्र सरकारच्या जाहितारीमध्ये काम करणार असल्याचं वृत्त अभिनेता अमिताभ बच्चन यांनी फेटाळलंय. पंतप्रधान कार्यालयातर्फे सरकारी जाहिरातीत काम करण्याविषयी आपल्याला कोणतीही ऑफर मिळालेली नसल्याचं बच्चन यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केलंय.
@Mjunaid_ullah @narendramodi @asadowaisi this news report is completely incorrect .. PM or PMO has not called or spoken to me ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 1, 2015
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मदतीला अभिनेता अमिताभ बच्चन धावून आल्याचे वृत्त होते. जातीयवादापेक्षा विकास महत्त्वाचा असा संदेश बिग बी मोदी सरकारच्या जाहिरातीतून दिसेल, असं या वृत्तात म्हटलं होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य हिंदूत्ववादी संघटनांनी धर्मांतराची मोहीम सुरु ठेवल्याने गोत्यात आलेल्या मोदी सरकारच्या मदतीला बिग बी यांना घ्यायचे ठरल्याचे वृत्त होते.
हिंदूत्ववादी संघटनांनी देशभरात घर वापसीची मोहीम राबवली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी धर्मांतरावरुन मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली होती. हिंदूत्ववादी नेत्यांच्या भडक भाषणामुळे मोदी सरकारची डोकेदुखी वाढवली होती.
घर वापसीमुळे मुस्लिम, ख्रिश्चन या अल्पसंख्यांक समाजामध्ये मोदी सरकारविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे विकासाऐवजी जातीयवादामुळे केंद्र सरकार जास्त चर्चेत राहिले. भविष्यात याचा फटका बसू नये आणि अल्पसंख्यांक समाजाचा विश्वास संपादन करता यावा यासाठी नरेंद्र मोदी सरसावल्याचे सांगितले जाते होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.