बाजीराव-मस्तानी जगभरात ३०१ कोटी

गेल्या वर्षी १८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर बाजीराव मस्तानीला जगभरात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. 

Updated: Jan 5, 2016, 08:35 PM IST
बाजीराव-मस्तानी जगभरात ३०१ कोटी title=

मुंबई : गेल्या वर्षी १८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण स्टारर बाजीराव मस्तानीला जगभरात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. 

या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल ३०० कोटी कमावलेत. सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात करणाऱ्या बाजीराव-मस्तानीने काही दिवसांत वेग घेतला आणि दिलवालेला तोडीस तोड उत्तर दिले. प्रेक्षकांची पसंतीची पावती या चित्रपटास मिळतेय.

दिलवाले आणि बाजीराव मस्तानी हे दोन बड्या बॅनरचे चित्रपट एकाचदिवशी प्रदर्शित झाल्याने दोन्ही चित्रपटांत काँटे की टक्कर होती. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.