बॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू...

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे. 

Updated: Dec 9, 2015, 03:28 PM IST
बॉलिवूडमधील अभिनेत्री आई आणि त्याचे बछडू... title=

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी आणि सिनेनिर्माता आदित्य चोपडा यांच्या घरी आज एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालंय. रानी - आदित्यचं हे पहिलंच अपत्य आहे. 

आदित्या चोपडा याचा छोटा भाऊ उद्य चोपडा आणि मित्र करन जोहर यांनी ट्विटरवरून ही बातमी दिलीय. 'मुलगी' असं ट्विट करत उदयनं चिमुकलीचं स्वागत केलंय. 

यापूर्वी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्री आई झाल्या आहेत. 


जेलेनिया डिसूझा 

बॉलीवूडमधील सर्वात नटखट आणि चुलबुली जोडी जेलेनिया आणि रितेश देशमुख. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न झाले. त्यानंतर त्यांना ५ नोव्हेंबर २०१४ मध्ये रिआन नावाचा मुलगा झाला. 

 


लारा दत्ता 

२०११ मध्ये भारतीय टेनिस स्टार महेश भूपती याच्याशी लारा दत्ता यांने लग्न केले. तिच्या मुलीचे नाव साईरारा. लग्नानंतर काही काळ तीने रूपेरी पडद्याला ब्रेक दिला होता. पण लवकर तिने सिंग इज ब्लिंगमध्ये दिसून आली होती. 

 


ऐॅश्वर्या राय बच्चन 

२००७ मध्ये ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चन याच्याशी लग्न केले. ब़ॉलिवूडमधील राज घराण्यात या राजकुमारीने लग्न केले. १६ नोव्हेंबर २०११ रोजी तिने एका कन्येला जन्म दिला. तिचे नाव आराध्या ठेवण्यात आले. 


उदिता गोस्वामी 

डायरेक्टर मोहीत सूरी याच्याशी अभिनेत्रई उदिता दत्ता हिने २०१३ मध्ये लग्न केले. त्यानंतर २०१५ मध्ये एका मुलीला जन्म दिला. 

शिल्पा शेट्टी 

शिल्पा शेट्टी हिने २२ नोव्हेंबर २००९ मध्ये राज कुंद्रा याच्याशी लग्न केले. तिला २१ मे २०१२ मध्ये विआन नावाचा मुलगा झाला. 


कोंकणा सेन 

कोंकणा सेन हिने सह अभिनेता रणबीर सुरी याच्याशी ३ सप्टेंबर २०१० रोजी लग्न गेले. त्याने हारून सुरी नावाचा मुलगा आहे, १५ मार्च २०११ रोजी त्याचा जन्म झाला. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.