सलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी

सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. 

Updated: May 26, 2015, 01:15 PM IST
सलमान खानला दुबईला जाण्यासाठी हायकोर्टाची परवानगी title=

मुंबई: सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी मुंबई हायकोर्टानं दिलाय. शूटिंग आणि काही उपचाराकरता सलमान खानला दुबईला जायचं होतं. त्यानं त्यासंदर्भात मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. 

त्यावर चार दिवसांनंतर आज सुनावणी झाली आणि मुंबई हायकोर्टानं सलमान खानला दुबईला जाण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच ८ मे रोजी सलमान खानला मुंबई हायकोर्टानं नवीन जामीन मंजूर केला होता. त्यानुसार सलमान खानला देश बाहेर जाता येणं शक्य नव्हतं.

परिणामी सलमान खाननं कोर्टात अर्ज करुन देशाबाहेर जाण्याची परवानगी मागितली होती. ती कोर्टानं आज मान्य केली आहे. सलमान सध्या हिमाचल प्रदेशमध्ये बहिण अर्पिताच्या रिसेप्शनसाठी गेलेला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.