'कॅटरिना बुद्धीबळाची उत्कृष्ट खेळाडू आहे'- आमिर

नेहमी बुद्धीबळाबद्दलची आपली आवड व्यक्त करणाऱ्या आमिर खानला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी भेटली. आमिर खानला माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदसोबत बुद्धीबळ खेळण्याची संधी मिळाली होती.

Updated: May 25, 2015, 06:41 PM IST
'कॅटरिना बुद्धीबळाची उत्कृष्ट खेळाडू आहे'- आमिर title=

मुंबई: नेहमी बुद्धीबळाबद्दलची आपली आवड व्यक्त करणाऱ्या आमिर खानला त्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी भेटली. आमिर खानला माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदसोबत बुद्धीबळ खेळण्याची संधी मिळाली होती.

आमिर खान आणि विश्वनाथन आनंद 'महाराष्ट्र चेस लीग'च्या तिसऱ्या सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते. यादरम्यान हे दोघे बुद्धीबळाचा एक राऊंडही खेळले. 

आमिरने या खेळासंदर्भात एका मुलाखतीत सांगितले की, , बॉलिवूडमध्ये कॅटरिना कैफ, परेश रावल आणि निर्माता आशुतोष गोवारीकर चांगलं बुद्धीबळ खेळतात. आमिर खान 'धूम-३'च्या सेटवर कॅटरिनासोबत नेहमी बुद्धीबळ खेळत असत. याशिवाय आमिर परेश रावल यांच्यासोबतही वेळ मिळाला की बुद्धीबळ खेळतो. आमिरच्या मते, क्रिएटीव्हीटी वाढवण्यासाठी हा खेळ उपयोगी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.