लॉस एंजेलिस: हॉलिवूड अभिनेत्री मेलानी ग्रिफिथवर तिची मुलगी डकोटा जॉनसननं आपला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ बघण्यावर बंदी घातलीय.
फीमेलफर्स्ट.co.uk या वेबसाइटनुसार 56 वर्षिय मेलानी म्हणते की, तो एक कामुक चित्रपट आहे, तो बघायची शक्यता नाहीय, या चित्रपटात तिची 24 वर्षीय मुलगी डकोटानं अभिनय केलाय.
मेलानीनं सांगितलं, “फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे” मी पाहिला नाही. मला नाही वाटत की हा चित्रपट मी पाहिल. डकोटाची प्रतिक्रिया होती, “तुम्ही लोकं येवू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत नाही.” म्हणून नाही गेलो आम्ही.
जेव्हा ती साध्या दृश्यांचं चित्रिकरण करत होती, तेव्हा मी जायची, असंही मेलानीनं सांगितलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.