मुंबई : बॉलिवूडचा किंग खान आणि 'कोलकाता नाईट रायडर्स' टीमचा मालक शाहरूखला 'ईडी'नं म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलेत.
शाहरुख खानवर 'केकेआर'चे शेअर बाजारभावाहून कमी किंमतीत विकण्याचा आरोप आहे. शाहरुखनं हे शेअर्स अभिनेत्री जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांना अत्यंत कमी किंमतीत विकले आहेत.
शाहरुखला या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुही चावलालाही समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखने हे शेअर कमी किंमतीत का विकले? याची माहिती ईडीला हवी आहे.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, या बाबतीत 'ईडी'ने शाहरुखची चौकशी करण्याची ही दुसरी वेळ आहे. २०११ मध्येही ईडीनं याबाबतीत शाहरुख खानची चौकशी केली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.