'सिली एक्स' म्हणणाऱ्या कंगनाला हृतिकनं दिलंय उत्तर...

नुकतंच अभिनेत्री कंगना रानौत हिनं हृतिकविषयी बोलताना 'सिली एक्स' असा उल्लेख केला होता. त्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं न बोलणाऱ्या हृतिकनंही कंगनाला आता प्रत्यूत्तर दिलंय. सोशल मीडियावर हृतिकनं आपल्या मनातल्या भावना मांडल्यात.

Updated: Jan 29, 2016, 12:17 PM IST
'सिली एक्स' म्हणणाऱ्या कंगनाला हृतिकनं दिलंय उत्तर...  title=

मुंबई : नुकतंच अभिनेत्री कंगना रानौत हिनं हृतिकविषयी बोलताना 'सिली एक्स' असा उल्लेख केला होता. त्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं न बोलणाऱ्या हृतिकनंही कंगनाला आता प्रत्यूत्तर दिलंय. सोशल मीडियावर हृतिकनं आपल्या मनातल्या भावना मांडल्यात.

'मीडियानं जेवढ्या महिलांसोबत माझं नाव जोडलंय... त्यापेक्षा पोप  सोबत डेटवर जाण्याचे माझे जास्त चान्सेस आहेत' असं ट्विट हृतिकनं केलं. हे ट्विट त्यानं कंगनाला उद्देशूनच केलं असल्याच्या जोरदार चर्चा आहेत. 

एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना राणावतने हृतिक रोशनवर तोंडसुख घेतले आणि त्याला 'एक्स' म्हणून संबोधलं होतं. त्यानंतर हृतिक आणि कंगना हे एकेकाळ एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं होतं. 

'आशिकी ३'मधून हृतिकमुळे बाहेर पडली का? या प्रश्नाचं उत्तर देताना कंगनानं म्हटलं होतं 'हो, मलाही अशा ऐकीव गोष्टी ऐकायला मिळाल्या. मला माहीत नाही की सिली एक्स पार्टनर्स पब्लिसिटीसाठी अशा हरकती का करतात. माझ्यासाठी तो चॅप्टर संपलाय...आणि मला जुन्या गोष्टींना उजाळा द्यायचा नाही'. यामुळे, आता हे दोघे एकत्र नाहीत हे तरी स्पष्ट झालंय. 

उल्लेखनीय म्हणजे, सुझान-हृतिकच्या घटस्फोट झाला त्यावेळी यामागचं कारण कंगना रानौत असल्याच्या चर्चा सुरू होत्या.