बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने आपल्या लहानपणीच कारकीर्दीत नावं कमवलं. आलिया भट्टने अलीकडेच एका टीवी शो मध्ये अनुपम खेर याच्यांशी बोलतांना आपल्या जीवनातल्या अनेक आठवणींचा उजाळा दिला तर काही गुपीते अघड केली. ज्याने कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आलियाने सांगितले, जेव्हा ती 16-17 वर्षांची होती तेव्हा तिच्या कुटुंबाशी खोटं बोलून उशीरा-रात्रीपर्यंत पार्टीला गेली होती. नंतर आलिया म्हणते, आजकल पार्टीचं ग्लॅमर इतकं आहे की आपण स्वतःला भटकण्यापासून थांबवू शकत नाही.
मी ज्यावेळी चोरुन पार्टीला जात होते त्यावेळी मला वडील खूप ओरडले. आता मला नेहमी काम गंभीरपणे करायला त्यांनी सांगितले आहे. मात्र, काम करतानां जास्त मजा करण्यासाठी वेळचं मिळत नाही, असं आलिया सांगते.
मी खूप ड्रिंक्सही केलंय. काही वेळा तर जास्तच. आता हे योग्य किंवा चुकीच आहे माहीत नाही. मात्र, मी याबद्दल माझ्या आईला सांगितले आहे. माझी आई, खूपच मोठ्या मनाची आहे. मला तिने अनेकवेळा धीर दिलाय. मला पुढे ऐश्वर्या राय आणि करीना कपूर यांच्यासारखे काम करायचे सांगून ते आदर्श अल्याचे म्हटले. तर शाहरुख खान सारखही काम करायचंय, असं ती सांगते.
मला आयुष्यात काहीतरी असं करायचं आहे की, मी नेहमी सर्वांच्या लक्षात राहीन. मला एक सुपरस्टार व्हायचं. मी आतापर्यंत फक्त पहिली पायरी चढली आहे. अजून खूप बाकी आहे, असे आलियाने सांगितले.
आलियाने म्हंटल की तिचे पिता महेश भट्ट नेहमी सांगतात की जेव्हा तूम्ही स्वतःशी समाधानी झालात किंवा तूम्हाला असं वाटू लागलं त्याच दिवशी तूमचं पतन सुरू होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.