आयपीएल येणार आता मराठीत

ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. मराठमोळं‘आयपीएल’येतंय. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

Updated: Dec 2, 2014, 07:13 PM IST
आयपीएल येणार आता मराठीत title=

मुंबई : ही कुठली क्रिकेट स्पर्धा नाहीये, तर ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ आहे. मराठमोळं‘आयपीएल’येतंय. म्हणजे आगामी मराठी चित्रपटाचं हे नाव आहे. येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचा म्युझिक लॉंन्च सोहळा नुकताच खासदार रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबईत पार पडला. एमआरपी फिल्म्स प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते मोहन पुरोहित आहेत.
दीपक कदम यांचे दिग्दर्शिन आहे. शीतल उपरे याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. शीतलसोबत स्वप्नील जोशी ज्युनिअर, विजय पाटकर, विजय कदम, संतोष मयेकर, सिया पाटील, सुनील तावडे, उषा साटम, लेखा राणे आदी कलाकारही या चित्रपटात आहेत.
येत्या १२ डिसेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता हे मराठमोळं आयपीएल किती चौकार आणि षटकार मारू शकेल हे येणारी वेळच सांगेल. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.