मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालेय.
करीना आणि सैफला पुत्ररत्नाचा लाभ झालाय. करीनाने सकाळी साडेसात वाजता ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. करीना आणि बाळ दोघेही सुखरुप असल्याची माहिती मिळालीये. तैमूर अली खान पतौडी असं बाळाचं नाव ठेवण्यात आलंय.
होणाऱ्या बाळाबद्दल सैफ म्हणाला होता, येणारे बाळ हे माझ्या आणि करीनाच्या रिलेशनशिपला पूर्ण करणारे असेल. करीनाला प्रसूतीची तारीख 20 डिसेंबर देण्यात आली होती.
बाळाच्या आगमनाची वार्ता कळताच दिग्दर्शक करण जोहरने ट्विट करुन करीनाचे अभिनंदन केलेय. माझ्या बेबोला मुलगा झालाय असे त्याने ट्विट करुन म्हटलेय.
My Bebo had a baby boy!!!!!!! Am so so happy!!!!!!! #TaimurAliKhan
— Karan Johar (@karanjohar) December 20, 2016