कतरीना देतेय तिचा घराचा पत्ता... तुम्ही पार्टीला जाणार?

बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. कॅटरीनाचे म्हणणे आहे की, तिच्या नव्या घराचा आनंद ती तिच्या फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या नवीन घराची पार्टी तिला तिच्या फॅन्ससोबत साजरी करायची असल्याचेही तिने सांगितले आहे.

Intern - | Updated: Apr 26, 2017, 03:40 PM IST
कतरीना देतेय तिचा घराचा पत्ता... तुम्ही पार्टीला जाणार? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ नवीन घर घेण्याच्या तयारीत आहे. कतरीना तिच्या नव्या घराचा आनंद आपल्या फॅन्ससोबत साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. आपल्या नवीन घराची पार्टी तिला तिच्या फॅन्ससोबत साजरी करायची असल्याचंही तिनं म्हटलंय.

वांद्रयातील माऊंट मेरी चर्च परिसरात कतरीनानं अनेक घरं बघून ठेवली होती. त्यातील एक घर तिला आवडलेले आणि ते ती खरेदी करणार असल्याचे सांगण्यात येत होतं. 

कतरीनानं फेसबूकवर केलेल्या एका पोस्टमध्ये ती म्हणाली आहे की, ‘मी लवकरच नवीन घर खरेदी करणार आहे, माझ्या या नवीन घराचा पत्ता मी तुमच्यासोबत शेअर केला तर तुम्ही माझ्या घरी येतील का ?’ तसेच त्यासोबत तिने एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती एक कागद घेऊन उभी आहे. त्या कागदावर तिने लिहीलं आहे की तिने घर खरेदी केलय आणि २७ एप्रिलला ती तिथे शिफ्ट होणार आहे.

रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये असताना ती वांद्र्यामध्येच राहत होती. रणबीर आणि तिने एक भाड्याचं घर घेतलं होतं त्यात ते एकत्र राहात होते. परंतु त्यांच्यामध्ये झालेल्या ब्रेकअपनंतर रणबीरने ते घर सोडलं आणि ते दोघे वेगळे राहायला लागले. त्यामुळे कॅटरीनालाही नवीन घर घेणे आवश्यक होते. सुरूवातीपासून ती वांद्र्यामध्ये राहात असल्याने ती वांद्र्यातच घर शोधत होती. मुबईच्या बाकी भागातही तिने घर शोधलं परंतु तिला कुठेही मनासारखं घर नाही मिळालं. तिला कमी गर्दीच्या परिसरात घर हवं होतं. त्यामुळे तिने माऊंट मेरी चर्च परिसरातच घर घेतल्याचं सांगण्यात येतंय.