फेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?

बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.

Updated: Oct 21, 2014, 09:12 PM IST
फेब्रुवारीत रणबीर-कतरीना लग्नगाठ बांधणार?

मुंबई : बॉलिवूडची सर्वात चर्चित जोडी रणबीर-कतरीना लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये हे दोघे जण लग्न गाठ बांधणार असल्याची चर्चा जोरात आहे.

रणबीर आणि कतरिना हे दोघंही आपापल्या सिनेमांची शुटिंग संपविण्यात व्यस्त आहेत. ही जोडी 'व्हेलेंटाइन डे'च्या दिवशी लग्न करणार असल्याचं समजतंय. 

रणबीर सध्या दीपिका पादुकोणसोबत ‘तमाशा’ या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे तर ‘जग्गा जासून’ या सिनेमासाठी कतरीनाने मार्शल आर्ट ‘क्राव मॅगा’चे ट्रेनिंग घेत आहे. 

दुसरीकडे कपूर घराण्याच्या लाडक्या चिरंजीवाचा विवाह धूम-धडाक्यात लावण्याची तयारी जोरात सुरू आहे. ‘जग्गा जासूस’ या सिनेमाच्या प्रदर्शनाआधाच कतरिना रणबीरसोबत आपल्या नात्याला एक नाव देऊ शकेल, अशी शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.