मुंबई : सैराट चित्रपटातील परश्याच्या दोन जीवलग मित्रांची भूमिका साकारणारे सल्या आणि बाळ्या अर्थाच तानाजी गळगुंडे आणि अरबाज शेख यांचेही सर्वत्र कौतुक केले जातेय.
तानाजी गळगुंडेने बाळ्याची भूमिका केली तर अरबाजने सल्याचे पात्र रंगवले. प्रेक्षकांची आर्ची-परश्याप्रमाणेच या दोघांच्या भूमिकेला मोठी पसंती मिळतेय. त्यामुळेच या दोघांबद्दल जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे.
एका मराठी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अरबाज आणि तानाजी यांनी स्वत:बद्दलची माहिती सांगितली. तानाजी गळगुंडे पदवीचे शिक्षण घेत असून तो कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाला आहे तर सल्या म्हणजेच अरबाज बारावीत शिकतोय.
सिनेमाचा खरा हिरो परश्या(आकाश ठोसर) पुणे युनिर्व्हसिटीतून एमएचे शिक्षण घेतोय. तर अभिनेत्री रिंकू राजगुरु नुकतीच नववीची परीक्षा पास झालीये.