माधुरी दीक्षितला पाहायचाय सैराट

सैराट बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेत असताना बॉलीवूडलाही या चित्रपटाने भुरळ घातलीये.

Updated: Jun 3, 2016, 02:04 PM IST
माधुरी दीक्षितला पाहायचाय सैराट title=

मुंबई : सैराट बॉक्स ऑफिसवर कोटीची उड्डाणे घेत असताना बॉलीवूडलाही या चित्रपटाने भुरळ घातलीये.

आतापर्यंत अनेक बॉलीवूड कलाकारांनी सैराट पाहिला आणि ट्विटवर त्याची स्तुती केली. आता बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही सैराट चित्रपट पाहायचाय.

यू कॅन डान्स या रिअॅलिटी शोमध्ये जेव्हा रितेश देशमुख चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता तेव्हा रितेश आणि माधुरी सैराटमधील झिंगाट या गाण्यावर नाचले होते.