'इलू इलू गर्ल' अध्यात्माच्या वाटेवर...

इलू-इलू गर्ल मनिषा कोईराला हरिद्वारमद्ये आपल्या गुरुंच्या आश्रमात दाखल झालीय. 

Updated: Feb 18, 2015, 01:47 PM IST
'इलू इलू गर्ल' अध्यात्माच्या वाटेवर...  title=

हरिद्वार : इलू-इलू गर्ल मनिषा कोईराला हरिद्वारमद्ये आपल्या गुरुंच्या आश्रमात दाखल झालीय. 

कॅन्सरसारख्या दुर्धर रोगावर मात केल्यानंतर मनिषाला अध्यात्ममार्गाची ओढ लागलीय. हरिद्वारच्या 'पायलट बाबां'ना मनिषानं आपला गुरू मानलंय. त्यामुळे, पुढचे 15 दिवस मनिषा त्यांच्या सेवेत दाखल झालीय. 

15 दिवस मनिषा याच आश्रमात राहणार आहे तसंच पूजेतही सहभागी होणार आहे. एकेकाळी करोडोंच्या हृदयावर ताबा मिळवणाऱ्या मनिषाला आता स्वत:च्या मनावर ताबा मिळवण्यासाठी 'पायलट बाबां'च्या आश्रमात दाखल झालीय. 

90 च्या दशकांत आपल्या घायाळ करणाऱ्या अदांनी मनिषा कोईरालानं आपली एक खास ओळक बनवली होती. 'सौदागर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या मनिषानं बॉम्बे, खामोशी, अकेले हम अकेले तुम, अग्नीसाक्षी, दिल से, एक छोटी सी लव्ह स्टोरी, 1942 ए लव्ह स्टोरी अशा अनेक सिनेमांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली.  

पण, लग्न आणि नंतर गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मनिषा पडद्याआड गेली. आजारावर इलाजासाठी मनिषा न्यूयॉर्कला गेली. याच, आजारादरम्यान मनिषाला अध्यात्माची ओढ लागल्याचं सांगितलं जातंय. काही दिवसांपासून मनिषा अनेक पूजा आणि भक्तीभावांच्या कार्यक्रमांना आवर्जुन हजेरी लावताना दिसते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.