मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे दोघे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले.
मीरा शाहीदपेक्षा तब्बल 13 वर्षांनी लहान आहे. 2015मध्ये या दोघांचे लग्न झाले. मात्र सुरुवातीला मीरा शाहीदशी लग्न करण्यास तयार नव्हती. मीराच्या मोठ्या बहिणीने तिला शाहिदशी लग्न कऱण्यास राजी केल्यानंतर ती लग्नास तयार झाली.
एका मुलाखतीदरम्यान शाहीदने मीरासोबतच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. लग्नाआधी मीराने शाहीदसमोर एक अट ठेवली होती. ज्यात तिने म्हटले होते की शाहीदने आपले केस पहिले होते तसे ठेवावेत. खरतर दोघांची भेट उडता पंजाबच्या शूटिंगदरम्यान झाली होती. यात शाहीदचे केस लांब होते. त्यामुळे मीराने ही अट ठेवली होती.